Monday, June 7, 2021

द एलियनिस्ट



 'द एलियनिस्ट' बघतोय.

पिरिएड ड्रामा आहे. १८९० ला न्यूयॉर्क मध्ये घडतो. बेघर मुलांना कोणी सिरियल किलर मारतोय त्याला पकडायचं आहे. पण न्यूयॉर्क पुलिस डिपार्टमेंट प्रामाणिक तपास करण्याऐवजी धनाढ्य लोकांना पाठीशी घालण्यास जास्त उत्सुक आहेत. मग त्याकाळी मानसिक रुग्ण म्हटल्याजाणार्‍या समस्या ग्रस्त मुलांना ते त्यांच्या मेंदूच्या ठाशिव विचारांपासून दूर गेले आहेत म्हणून एलियन म्हणत, आणि त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांना एलियनिस्ट म्हणत... तर असा एक एलियनिस्ट (सायकायट्रिस्ट) डॉ. लॅस्लो आणि दोघांची टीम बनते आणि ते समांतर तपास चालू करतात. अशी ढोबळ थीम आहे.

त्या काळानुसार ऐतिहासिक व्यक्ती जसं नवीनच पुलिस कमिशनर म्हणून रुजू झालेला 'थिओडोर रूझवेल्ट' येतो, 'जे.पी. मॉर्गन' येतो. असे पिरिएड ड्रामा लंडनचे खूप बघितले आहेत. ते बघताना जो फील येतो, तसाच फील जुनं न्यूयॉर्क, रस्त्याच्या मधुन दौडत जाणार्‍या घोडागाड्या, बकाल वस्त्या, तेथिल माणसांची मुलांची अवस्था, मुख्यधारेपासून वेगळे असलेल्या मुलांची अवस्था बघुन येतो.





न्यूडिटी फार नाही, पण ग्राफिक कंटेंट आहे. मुलांबरोबर बघण्यायोग्य नाही. दहा भागांची मिनी सिरिज आहे. नेटफ्लिक्सवर आहे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home