Wednesday, June 9, 2021

 हा लेख वेगळा विचार देणारा आणि इंटरेस्टिंग वाटला.



कार्बनडाय ऑक्साईडच्या वाढत्या प्रमाणाचा समुद्राची पातळी, पाऊस, वादळे इ. परिणाम यावर वाचलं होतं. पण झाडे हवेतून कार्बनडायऑक्साईड शोषून घेतात, तर त्याचं हवेतील तुलनात्मक प्रमाण वाढलं तर झाडे त्याच्याशी कशी जुळवुन घेतात/ घेतील? तर झाडांची पाने जाड बनतील आणि त्याचे दुष्परिणाम आणखी वाईट असतील. हवा थंड ठेवणे, वाफ बाहेर सोडणे, कार्बन साठवून ठेवणे, साखर तयार करणे इ. झाडांमुळे होणार्‍या गोष्टींचा वेग मंदावेल आणि म्हणून सध्याची कार्बन मॉडेल ट्युन करावी लावतील असा रोख आहे अभ्यासाचा.
वाढत्या कार्बन डायॉक्साईडचा सगळ्याच निसर्गावर काय परिणाम होईल, निसर्ग तो परिणाम कसा ट्युन करेल हा विचार रोचक वाटला.

https://www.washington.edu/news/2018/10/01/thick-leaves-high-co2/


Monday, June 7, 2021


अननोन (Unknown) बघितला.

एक बायोकेमिस्ट डॉ. मार्टिन हॅरिस (लीअम नीसन) आणि त्याची बायको जर्मनीत बर्लिनला एका कॉन्फरन्ससाठी आलेत. या कॉन्फरन्स मध्ये डॉ. हॅरिसचा जर्मनीतील एक शास्त्रज्ञ मित्र एका अरब प्रिंसच्या आर्थिक पाठबळातून एक ग्राऊंड ब्रेकिंग रिसर्च पब्लिश करणार आहेत. डॉ. हॅरिसची बायको कॉन्फरन्स असलेल्या हॉटेलात चेक-इन करते पण हॉटेलच्या दारातुन सामान घेऊन शिरता शिरता डॉ. हॅरिसच्या आपण आपली ब्रिफकेस एअरपोर्टवर विसरल्याचे लक्षात येते, आणि म्हणून ते ताबडतोब दुसरी टॅक्सी करुन परत एअरपोर्टवर जायला निघतात. टॅक्सी ड्रायव्हरला पटकन पोहोचायचं आहे याचे जाणिव करुन देतात आणि एक अघटीत अपघात घडतो आणि टॅक्सी नदीत पडते. चार दिवसाच्या बेशुद्धीतुन जागे झाल्यावर थोड्या प्रयत्नाने आपण कोण आहोत हे डॉ. हॅरिसना आठवते, पण परत हॉटेल मध्ये गेल्यावर आपल्या जागी दुसराच डॉ. हॅरिस आलेला बघुन अचंबा, राग आणि काही तरी काळंबेरं असल्याचा संशय येतो. त्या दुसर्‍या व्यक्तीकडे सगळे पुरावे असतात, बायकोही ओळख दाखवत नाही.. आणि आपल्या आणि हॅरिसच्या मनात गोंधळ वाढत जातो.
या प्रकरणाचा छडा लावताना काय काय गोष्टी घडतात याचा श्वासरोखून अनुभव म्हणजे अननोन. शेवट अर्थातच संपूर्ण अतर्क्य आणि आपण कल्पिलेल्या शक्यतांच्या विपरीत घडतो. शेवटा पर्यंतचा प्रवास आणि प्रत्यक्ष शेवट दोन्ही उत्कंठावर्धक असल्याने दीड तास मजेत जातो.
मला आवडला चित्रपट.
नेटफ्लिक्सवर आहे.


द एलियनिस्ट



 'द एलियनिस्ट' बघतोय.

पिरिएड ड्रामा आहे. १८९० ला न्यूयॉर्क मध्ये घडतो. बेघर मुलांना कोणी सिरियल किलर मारतोय त्याला पकडायचं आहे. पण न्यूयॉर्क पुलिस डिपार्टमेंट प्रामाणिक तपास करण्याऐवजी धनाढ्य लोकांना पाठीशी घालण्यास जास्त उत्सुक आहेत. मग त्याकाळी मानसिक रुग्ण म्हटल्याजाणार्‍या समस्या ग्रस्त मुलांना ते त्यांच्या मेंदूच्या ठाशिव विचारांपासून दूर गेले आहेत म्हणून एलियन म्हणत, आणि त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांना एलियनिस्ट म्हणत... तर असा एक एलियनिस्ट (सायकायट्रिस्ट) डॉ. लॅस्लो आणि दोघांची टीम बनते आणि ते समांतर तपास चालू करतात. अशी ढोबळ थीम आहे.

त्या काळानुसार ऐतिहासिक व्यक्ती जसं नवीनच पुलिस कमिशनर म्हणून रुजू झालेला 'थिओडोर रूझवेल्ट' येतो, 'जे.पी. मॉर्गन' येतो. असे पिरिएड ड्रामा लंडनचे खूप बघितले आहेत. ते बघताना जो फील येतो, तसाच फील जुनं न्यूयॉर्क, रस्त्याच्या मधुन दौडत जाणार्‍या घोडागाड्या, बकाल वस्त्या, तेथिल माणसांची मुलांची अवस्था, मुख्यधारेपासून वेगळे असलेल्या मुलांची अवस्था बघुन येतो.





न्यूडिटी फार नाही, पण ग्राफिक कंटेंट आहे. मुलांबरोबर बघण्यायोग्य नाही. दहा भागांची मिनी सिरिज आहे. नेटफ्लिक्सवर आहे.